AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Apr 19, 07:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
फळपिकांसाठी विमा संरक्षण
राज्यात निवडक फळपिकांसाठी हवामान आधारित प्रधानमंत्री फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना फळपीक निहाय अधिसूचित केलेल्या जिल्हयामधील, तालुक्यातील, महसूल मंडळात राबविण्यात येते. कार्यान्वित करणारी विमा कंपनी सदर योजना शासनाच्या निर्देशित हवामान केंद्र येथे नोंदल्या गेलेल्या हवामानाच्या तपशीलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना ग्राह्य होणारी नुकसान भरपाई परस्पर देईल.
मार्च २०१९ मध्ये काही ठिकाणी तापमानात खूप वाढ दिसून आली आणि येणार्‍या एप्रिल व मे २०१९ मध्ये तापमान वाढण्याची शक्यता लक्षात घेता, यामुळे काही पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीत ठराविक फळपीक निहाय तापमान ठराविक मर्यादेच्या पुढे गेल्यास, त्या फळपिकासाठी निश्चित करण्यात आलेल्या हवामान धोके/ट्रिगर नुसार त्या फळपिकासाठी विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळू शकते._x000D_ शेतकर्‍यांनी अधिक महितीसाठी संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा._x000D_ संदर्भ – कृषी जागरण, २६ एप्रिल २०१९_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0