कृषि वार्ताअॅग्रोवन
राष्ट्रीय संस्थेचा दर्जा मिळणार कांदा संचालनालयाला
पुणे:राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण संशोधन संचालनालयाचे रूपांतर राष्ट्रीय संशोधन संस्थेत (एनआरसी) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संशोधनाला चालना आणि शास्त्रज्ञांच्या संख्येत वाढ होणार आहे. चीननंतर जगात सर्वांत जास्त कांदा भारतात पिकवला जातो. साडेनऊ लाख हेक्टरवर अंदाजे १६३ लाख टन कांदा उत्पादन करणाऱ्या भारतात कांदा उत्पादक भाग वाढतो आहे. चीनच्या तुलनेत प्रतिहेक्टरी कांदा उत्पादकता मात्र कमी आहे. त्यासाठी नाशिकचे एनएचआरडीएफ आणि राजगुरुनगरचे कांदा संचालनालय सातत्याने संशोधन करते आहे.
“संचालनालयाचे रूपांतर राष्ट्रीय संशोधन संस्थेत करण्याचा निर्णय तत्त्वतः झालेला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) वार्षिक सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर परिषदेचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या स्वाक्षरीने या निर्णयाला अंतिम रूप मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. संदर्भ – अॅग्रोवन, २५ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0
संबंधित लेख