AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Apr 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
‘या’ विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा पिकांची लागवड
पुणे: उन्हाळी हंगामात पुणे विभागात १३ हजार १२७ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. त्यामुळे पुढील एक ते दीड महिन्यात काही प्रमाणात चारा उपलब्ध होईल. दरवर्षी मे, जून आणि जुलै महिन्यांत चारा उपलब्ध होण्यासाठी उन्हाळी हंगामात मार्च महिन्यात मका, कडवळ, लुसर्नग्रास, नेपिअरग्रास, बाजरी अशा विविध चारा पिकांची लागवड केली जाते. चारा पिकांच्या लागवडीनंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यांनंतर चाऱ्यांचे उत्पादन होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस व पावसाळ्याच्या तोंडावर चाराटंचाई कमी होण्यास मदत होते.
उन्हाळी हंगामात नगर जिल्ह्यात दोन हजार ५१८ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली. यामध्ये श्रीगोंदा, पाथर्डी, संगमनेर या तीन तालुक्यांत चारा पिकांची लागवड झाली आहे. पुणे जिल्ह्यात पाच हजार ९२३ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली असून यामध्ये हवेली, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर या तालुक्यांत चारा पिकांची लागवड झाली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, २३ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
2
0