कृषि वार्ताअॅग्रोवन
दुष्काळ मुक्त करण्यासाठी परदेशातील समाजसेवक सरसावले
गोंदवले, जि. सातारा : दुष्काळ मुक्त आता, परदेशातील समाजसेवक सरसावले आहे. स्वित्झर्लंड येथील समाजसेवक रोनाल्ड फुटिंग हे सध्या माण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करत आहेत. यानंतर जलसंधारणाच्या तोंडी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास माणमधील दुष्काळी गावांना हरित करण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता आहे. यंदाही दुष्काळमुक्तीसाठी लोक एकत्र आल्याची माहिती रोनाल्ड फुटिंग यांना समजल्यावर ते भारतात आले आहेत. नुकतेच त्यांनी गोंदवले खुर्द, शिंदी बुद्रुक भागात सुरू असलेल्या जलसंधारण कामांना भेटी दिल्या. या कामामुळे ते समाधानी असले तरी केवळ पाणी अडविण्याशिवाय संपूर्ण दुष्काळमुक्तीसाठी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी, असे आवाहन रोनाल्ड फुटिंग यांनी केले आहे. लोकसहभागातून सुरू असलेल्या या कामाच्या माध्यमातून हरित गावे करण्यासाठी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास परदेशातूनही मदतीचा ओघ सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.
स्वित्झर्लंडमध्ये वकील असणारे रोनाल्ड फुटिंग सध्या माणमधील गावागावात या कामांची पाहणी करून मार्गदर्शन करत आहेत. रोनाल्ड फुटिंग यांनी यापूर्वी लोधवड्यातील ‘माती आडवा पाणी जिरवा’साठी मोठे योगदान दिले होते. याशिवाय लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रमांतून मदत केली होती. पाणी अडवण्याशिवाय संपूर्ण परिसर हरित करण्यावर त्यांचा अधिक भर आहे. गेल्या १२ वर्षांपूर्वी लोधवड्यात येऊन त्यांनी यासाठी यशस्वी कामगिरी केली. संदर्भ - अॅग्रोवन, २१ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
5
0
संबंधित लेख