कृषि वार्तालोकमत
पशुगणनेस मुदतवाढ
बारामती- यंदा प्रथमच होत असलेल्या डिजिटल पशुगणनेला केंद्र शासनाच्यावतीने मुदतवाढ दिली आहे. ३१ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना व पशुपालकांना आपल्या जनावरांच्या नोंदी पशुसंवर्धन विभागाकडे करता येणार आहेत. मुदतवाढ मिळाल्याने पशुगणना करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
दर पाच वर्षानंतर शासनाच्यावतीने पशुगणना करण्यात येते. यंदा प्रथमच डिजिटल पध्दतीने ऑनलाइन पशुगणना करता येते. तालुक्यातील २३ पशु वैदयकीय केंद्रापर्यंत ही पशुगणना करण्यात येत आहे. यासाठी पशुधन पदविका अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या प्रगणकाच्या माध्यमातून टॅबद्वारे ही पशुगणना करण्यात येत आहे. या प्रगणकांवर देखरेखीसाठी ५ पशुधन विकास अधिकाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. तर तालुका पशुधन विकास अधिकारी डॅ. रमेश ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही पशुगणना करण्यात येत आहे. या पशुगणनेसाठी २०११ च्या जनगणनेच्या कुटुंबाच्या नोंदीनुसार प्रत्येक घरी जाऊन जनावरांची माहिती घेतली जात आहे. यामध्ये गाई, म्हशी, शेळी, मेंढी, ससे, कुत्रे, घोडे, कोंबडया व इतर पाळीव पशूंची गणना करण्यात येत आहे. पाळीव पशूंमध्ये साहजिकच गाई, म्हशींची संख्या जास्त असते. पशुगणना करताना देशी, विदेशी जातींच्या गाईंची संख्या मोजली जात आहे. देशी पशूंचे जातींनुसार वर्गीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे देशी पशुधनाची माहिती आकडयांमध्ये मिळण्यास मदत होणार आहे. संदर्भ – लोकमत, २३ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1
0
संबंधित लेख