AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Apr 19, 07:00 PM
कृषि वार्तालोकमत
द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात
पुणे: सांगली व पुणे जिल्हयातील द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तर सोलापूर जिल्हयातील द्राक्षांचा हंगाम आणखी १५ ते २० दिवस सुरू राहणार आहे. गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये दररोड द्राक्षांची अवघी दोन ते अडीच टन इतकीच आवक होत आहे. परंतु हंगाम अंतिम टप्प्यात असूनदेखील उन्हाळयामुळे मागणी कायम असल्याने चांगले दर मिळतात.
द्राक्षांचा हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू झाला होता. त्याचवेळी द्राक्षांची आवक ही नगन्य होती, तसेच द्राक्षांना तुलनेने गोडी ही कमी होती. मात्र जानेवारी महिन्याच्या मध्यानंतर द्राक्षांची आवक मोठया प्रमाणात वाढत गेली. यंदा द्राक्षांचा हंगाम ऐन बहरात आला असताना सर्वात जास्त १०० टन एवढी आवक झाली होती. ही आवक महिनाभर सुरू होती. संदर्भ – लोकमत, २० एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
0
0