कृषि वार्ताअॅग्रोवन
‘या’ प्रकल्पाला १०० कोटींचा निधी
अकोला: जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने सुमारे चार हजार कोटींचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत विविध कामांसाठी शासनाने १०० कोटींचा निधी दिला आहे. या प्रकल्पासाठी विदर्भ व मराठवाड्यातील हवामान बदलास अतिसंवदेनशील असलेली ४२१० गावे आणि खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा ५१४२ गावांमध्ये हा प्रकल्प राबविणार आहे. कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून निवड केलेल्या गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेतीपद्धती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत विविध उपाययोजना तसेच उपक्रम राबविले जाणार आहेत. निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी पहिल्या टप्‍प्‍यात १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यात बाह्य हिश्शाचा ७० कोटी आणि राज्य हिश्शाचा ३० कोटी रुपयांचा निधी आहे. यासाठी प्रत्येक गावांचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
बाह्य हिश्शाच्या निधीतून पीक संवर्धन, लहान-सीमांत शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना, हवामान अनुकूल कृषी प्रकल्प, अर्थसाह्य याविषयासाठी खर्च केला जाईल. राज्याच्या ३० कोटींतून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे, कार्यालयीन खर्च, विविध सेवांसाठीचे खर्च भागविले जातील. प्रकल्पासाठी हा निधी वितरित करण्यास सोमवारी शासनाने मान्यता दिली आहे. या निधीमुळे आता प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार असे बोलले जात आहे. संदर्भ – अॅग्रोवन, १७ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
8
0
संबंधित लेख