AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Apr 19, 06:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
हवामानानुसार कृषी सल्ला
राज्यावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. २१ व २२ एप्रिलला पश्चिम कोकण किनारपट्टीवरील राज्यावर १००८ हेप्टापास्कल इतका तर मध्य राज्याचा पुर्व भाग, उत्तरेकडील राज्य, विदर्भ व मराठवाडयावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. २३ एप्रिलला कोकण किनारपट्टीवर १००८ हेप्टापास्कल तर उर्वरित राज्यांवर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहिल्यामुळे हवामाना ढगाळ राहील तर अरबी समुद्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र व हिंदी महासागराचे पाण्याच्या पृष्ठ भागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल त्यातून बाष्पीभवन होऊन ढग निर्मितीस अनुकूल वातावरण तयार होईल. आठवडयाच्या सुरूवातीस आकाश निरभ्र राहील मात्र आठवडयाच्या मध्यनंतर वातावरण बदलणे शक्य आहे. मध्य राज्यात २५ एप्रिलला अल्पशा: प्रमाणात पाऊल होईल.
कृषी सल्ला: १. हळदीची लागवड ७ मे दरम्यान करावी. २. अक्षय तृतीया दरम्यान (७ मे) ला आले लागवड करावी. ३. निशिगंधाची लागवड मे महिन्यात करावी. ४. पॉलिहाऊस लागवडीवर भर दयावा. ५. पाऊसमानानुसार पीक पध्दती ठरवावी. ६. कोरडवाहू शेतीसाठी पुर्व मशागतीची कामे सुरू करा. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
24
0