कृषि वार्तालोकमत
राज्यातील साखर कारखान्यांनी केला इथेनॉल पुरवठा
पुणे – राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी १३ कोटी ३६ लाख ८४ हजार लिटर इथेनॉलचा पुरवठा केला असून, त्यातील साडेसात कोटी लिटर इथेनॉल सहकारी साखर कारखान्यांनी तयार केले आहे. २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. ऊसापासून तयार होणाऱ्या मोलॅसिसपासूनच नव्हे, तर ऊसाचा रस, खराब धान्य, सडलेले बटाटे, मका व अधिक उत्पादन झालेले धान्य यापासून ही इथेनॉल निर्मित करण्यात येणार आहे.
कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी कारखान्याने ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने साखर उदयोगाचे लक्ष त्याकडे लागले आहे. वारणा कारखान्याला १ कोटी ४५ लाख ५९ हजार लिटरचा कोटा मिळाला आहे. त्यापैकी २६ लाख ५३ हजार लिटर इथेनॉल मार्चअखेरीस पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, खंडोबा डिस्टिलरीज (१० कोटी ४२ लाख ३ हजार लिटर), गंगामाई इंडस्ट्रीज (२ कोटी ६२ लाख ५० हजार लिटर) व पद्मश्री विखे-पाटील सहकारी कारखाना (१ कोटी ३१ लाख २१ हजार लिटर) हे सर्वाधिक इथेनॉल पुरवठा करणारे राज्यातील पहिल्या तीन क्रमांकाचे कारखाने आहेत. संदर्भ – लोकमत, १५ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0
संबंधित लेख