AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Apr 19, 07:00 PM
कृषि वार्तालोकमत
बोगस बीटी बियाण्यांवर लक्ष देण्याची आवश्यकता
बोगस बियाणे आतापासून बाजारात आले असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मागील वर्षी मे महिन्यापर्यंत बीटी कपाशीचे बियाणे विक्री करण्यास विक्रेत्यांना कृषी मंत्रालयाने मनाई आदेश काढले होते. तरी ही शेतकऱ्यांना बीटी बियाणे उपलब्ध झाले. ते बियाणे नामांकित कंपन्यांचे नसल्याने त्यावर बोंडअळयाचा प्रादुर्भाव दिसून आला. यावर्षीही मनाई कायम असल्याने आतापासून बोगस बियाणे बाजारात आले असल्याचे वृत्त आहे.
ही बियाणे अधिकृत नसून या बियाण्यांना शासनाने विकण्याची परवानगी दिलेली नाही. या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, बियाणे तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेले नाही असे असताना या बीटीची विदर्भात चार-पाच वर्षांपासून सर्रास विक्री होत आहे. मागील वर्षी कृषी विभागाने काही विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली असली, तरी यावर्षी मात्र या बोगस बियाण्यावर आतापासूनच लक्ष देण्याची आवश्यकता आहे. संदर्भ – लोकमत, १० एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
7
1