AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Apr 19, 07:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
धान्य महोत्सव सुरू
बारामती: मशरूमचे लोणचे, पापडापासून ते गुळपट्टीपर्यंत आणि शरबती गव्हापासून ते हातसडीच्या तांदळापर्यंत अशा विविध धान्य व पदार्थांनी हा महोत्सव बाजार समितीचे रयत भवन येथे भरविण्यात आला आहे. हा धान्य महोत्सव शुक्रवारपासून सुरू झाला आहे. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या धान्य महोत्सवास शुक्रवारपासून येथील रयत भवन येथे सुरवात झाली. हा धान्य महोत्सव रविवारपर्यंत (ता. १४) सुरू राहणार आहे.
या महोत्सवात धान्य उत्पादक, महिला शेतकरी गट, सेंद्रिय शेतकरी गट, तसेच शेतकरी उत्पादक सहभागी झाले आहेत. तसेच या महोत्सवात पुणे जिल्ह्यासह बीड, सोलापूर, सातारा, वर्धा, सांगली जिल्ह्यांतून विविध उत्पादक सहभागी झाले आहेत. या वर्षीच्या धान्य महोत्सवात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने सहभागासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार बहुतांश स्टॉल हे सेंद्रिय उत्पादनांचे आहेत. संदर्भ – अॅग्रोवन, १३ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
2
0