कृषि वार्तालोकमत
कपाशीवर आता अमेरिकन लष्करी अळीचा धोका
गुलाबी बोंडअळी पाठोपाठ आता कपाशीवर अमेरिकन लष्करी अळीचा धोका वाढला आहे. सद्या या अळीने राज्यातील मका पिकावर बस्तान मांडल्याने कृषी विभागात खळबळ उडाली असून, पिकांवर लष्करासारखे आक्रमण करू न प्रचंड नुकसान करणाऱ्या ‘लष्करी’ चे कपाशीवर स्थलांतर होण्याची सर्वाधिक भिती असल्याने तातडीने व्यवस्थापन करण्यासाठी कृषी विभागाची धावपळ सुरू आहे.
ही अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट ‘वाय’ आकाराची खूण असते व शरीराच्या शेवटून दुसºया बाजूस (सेग्मेंट) चौकोनी आकारात चार ठिपके दिसून येतात तसेच त्या ठिपक्यावर केसही आढळून येतात. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, जालना, परभणी, जळगाव व विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील मका,ज्वारी आणि ऊस या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. या अळीचे पतंग एका रात्रीत सुमारे १०० किलोमीटर पर्यंतचा प्रवास करतात. लष्करी अळीच्या मादीची प्रजनन क्षमताही जास्त असून, मादी पतंग तिच्या जीवनक्रमात सुमारे एक ते दोन हजार अंडी घालण्याची क्षमता आहे. ही अळी झुंडीने पिकांवर आक्रमण करत असल्याने काही दिवसात संपूर्ण पीक फस्त करीत असल्याचे दिसून आले. कपाशीवरील गुलाबी अळीच्या पाचपट ही अळी नुकसान करीत असल्याने कृषी विभाग, विद्यापीठांच्या शास्त्रज्ञ चिंतामध्ये पडले आहेत. सध्या ही अळी मुख्यत्वे मका पिकावर आहे. तसेच ज्वारी व ऊस पिकांवरही प्रादुर्भाव दिसून आला. कपाशीवर ही अळी येण्याचा धोकाही सर्वात जास्त असल्याने कृषी विभाग,विद्यापिठांना आतापासूनन खबरदारी, उपाययोजनांवर भर द्यावा लागणार आहे. संदर्भ – लोकमत, ९ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0
संबंधित लेख