हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता
हवामानात वेगाने होणारे बदल या आठवडयात जाणवतील. जसे की, हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या पुष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. याचा परिणाम पाण्याचे मोठया प्रमाणात बाष्पीभवन होऊन ढग निर्मिती होईल. १३ एप्रिलला राज्यावरील हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी होतील तर नैऋज्ञ दिशेस १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहिल. साहजिकच, वारे नैऋत्येकडून दक्षिणेस १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहिल्यामुळे आग्नेय व दक्षिणेकडून वारे उत्तर दिशेने वाहतील. १४,१५,१६,१७ व १८ एप्रिलला राज्यावरील हवेच्या दाबात किंचित वाढ होऊन ते १००८ हेप्टापास्कल राहतील. मात्र पुर्वेस १०१०, वायव्येस १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे वारे पुर्वे व आग्नेयकडून मोठया प्रमाणात ढग लोटल्यामुळे राज्यात १० एप्रिलपासून पावसाचे वातावरण निर्माण होऊन १६ व १७ एप्रिलला चांगला पाऊस होईल. तसेच १८ एप्रिलला राज्याच्या पुर्व भागात पाऊस होईल. हा पाऊस वादळी वारे, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पडेल.
कृषी सल्ला: १. या आठवडयात पावसाची शक्यता असून पावसाचा जोर १६ व १७ एप्रिलला अधिक राहणे शक्य असल्याने उन्हात धान्य वाळत घालून नये. २. हळदीची काढणी करून ती शिजवून वाळत घातली असल्यास ती गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावी. ३. पक्व झालेल्या अंजिर फळाची काढणी करून विक्री करावी. ४. पक्व भाजीपाला, फळांची व फुलांची काढणी करून विक्री करावी. ५. फळबागांना आच्छादन करावे. ६. द्राक्ष पिकांची छाटणी करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
40
0
संबंधित लेख