कृषि वार्तालोकमत
कापूस पिकासाठी ‘ही’ काळजी घ्या - डवले
अकोला: बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण यशस्वी ठरलो; पण आता गाफील राहून चालणार नाही. तसेच नवीन अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान आपणासमोर आहे. बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी सर्व उपाययोजना करा, फरदडीचा कापूस घेऊ नका, कामगंध सापळे वापर वाढवा, शेतकऱ्यांना यथोचित मार्गदर्शन करा, असे आवाहन राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले.
"बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व मक्यावरील नवीन लष्करी अळी व्यवस्थापन मोहीम-२०१९ अंतर्गत कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांसाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाच्या कमिटी सभागृहात विदर्भस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डवले बोलत होते. डवले म्हणाले, यावर्षीदेखील सावधगिरीचा उपाय म्हणून कापसाचे बियाणे मे महिन्यानंतरच बाजारात पाठवले जाणार आहे. पूर्व हंगामी कापसाची पेरणी शेतकऱ्यांनी टाळावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. त्याचबरोबर बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यावर्षीही कृषी विभाग, विद्यापीठाला दक्ष राहावे लागणार असून, यासाठी पीक पॅटर्न बदलविण्यासाठीची जबाबदारी कृषी विभागाने स्वीकारावी. संदर्भ – लोकमत, ९ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
10
0
संबंधित लेख