हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात पावसाची शक्यता
अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या पृष्ठ भागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून या आठवडयात एप्रिल महिन्यात अवकाळी पुर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. राज्यात १४, १५, १६ व १७ एप्रिलला पावसाची शक्यता असून १६ एप्रिलला संपुर्ण राज्यात तर १७ एप्रिलला विदर्भ, मराठवाडा व पश्चिम राज्यातील मध्य व पूर्व भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. या आठवडयात १३ एप्रिल या दिवशी राज्यावरील हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी होऊन हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन १६ एप्रिलला मोठया प्रमाणात ढग जमा होऊन ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. १४ व १७ एप्रिलला हवेच्या दाबात वाढ होईल व १००८ हेप्टापास्कल इतका राहील. मात्र त्यावेळी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कायम राहील.
कृषी सल्ला: १. कलिंगड व काकडी पिकास योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करणे. २. कांदा काढणी करताना योग्य काळजी घ्यावी. ३. केळी, चिंकू, नारळ, लिंबू व आंबा यांच्या बांगाना योग्य प्रमाणात पाणी दयावे. ४. उन्हाळी हंगामात मुळा व कांदा पात उत्पादन करा. ५. उन्हाळी हंगामात मेथी, पालक, चाकवत, धने लागवड करावी. ६. हळद, आले, सुरण लागवडीसाठी जमिनीची पुर्वमशागत करावी. संदर्भ – ज्येष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ.रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
33
0
संबंधित लेख