कृषि वार्ताअॅग्रोवन
कृषी खात्याचे ‘महाअॅग्रिटेक’ अभियान
पुणे: कृषी खात्याच्या कामकाजाला दिशा देण्यासाठी ‘महाअॅग्रिटेक’ अभियान लागू करण्यात आले आहे. याचबरोबर मनुष्यबळ विकासाकरिता कृषी सहायकापासून ते संचालकांपर्यंत प्रकल्पाधारित कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे वाटप व त्याचे वार्षिक मूल्यमापन करण्याची पद्धत लागू करण्याचादेखील निर्णय घेण्यात आलेला आहे. सुधारणा करताना दीर्घकालीन, मध्यम मुदतीचे आणि येत्या खरिपासाठीचे असे तीन टप्पे केले जात आहेत. कृषी सचिवांनी अलीकडेच कृषी आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पुण्यात घेतली. यात काही टप्प्यांबाबत नियोजन व भूमिका ऐकून घेतली. दीर्घकालीन उपायांबाबत मात्र माहिती घेण्याचे काम पुढेही चालूच राहणार आहे. भविष्यात विविध धोरणात्मक निर्णय घेताना सुधारणांचा नवा अजेंडा डोळ्यासमोर ठेवला जाणार आहे. अर्थात, हा अजेंडा अजून कुठेही लिखित स्वरूपात आलेला नाही.
राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडून कृषी खात्यामधील मरगळ झटण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यासाठी कर्मचारी व अधिकारी वर्गाला विश्वासात घेऊन उपलब्ध मनुष्यबळचा जास्तीत जास्त वापर करण्याचे धोरण ठेवले जात आहे. कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या माध्यमातून ‘कृषी खात्याला जास्तीत जास्त वेगवान व पारदर्शक’ करण्याकडे कृषी सचिवांचा कल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. योजना वेगवान करण्यासाठी मध्यमकालीन उपाय • उद्दिष्ट लादण्यापेक्षा जिल्ह्याची, तालुक्याची गरज पाहून नियोजन • कृषी विस्तारासाठी शेतकऱ्यांना प्रयोगशील शेतकऱ्यांमार्फत सल्ला • शेतीशाळा उपक्रमाचे ‘ॲम्बेसेडर’ म्हणून प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड • गटशेतीसाठी ७२ कोटी रुपये दिले. अजून प्रोत्साहन व निधी देणार संदर्भ – अॅग्रोवन, ५ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
5
0
संबंधित लेख