कृषि वार्ताअॅग्रोवन
महाराष्ट्र साखर उत्पादनात अग्रेसर
देशात २५ मार्च पर्यंत जवळपास २८८.२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे १०३.६० लाख टन साखरेची निर्मिती झाली असून महाराष्ट्र देशात साखर उत्पादनात अग्रेसर ठरला आहे. या राज्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक असून ९०.६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. चालू साखर वर्षात देशभरात ३२४ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाजही प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केला.
ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असला तरीही साखरेच्या सरासरी उताऱ्यात उत्तर प्रदेशने बाजी मारली असून २५ मार्च पर्यंत उताऱ्याचे प्रमाण ११.३० टक्के आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ११.२० टक्के आहे तर कर्नाटक व गुजरात मध्ये ते अनुक्रमे १०.५० टक्के व १०.४० टक्के असे आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ५ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
2
0
संबंधित लेख