हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात तापमान कमी-जास्त
राज्याच्या घाटमाथ्यापासून कोकणापर्यंतच्या पट्टयात १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तर मराठवाडा, विदर्भावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मराठवाडा व विदर्भात कमाल व किमान तापमान वाढल्यामुळे हवेचे दाब कमी राहिल. ७ एप्रिलला हीच परिस्थिती कायम राहील मात्र त्या दिवशी कोकण व घाटमाथ्यावर व उत्तर राज्यात हवेचे दाब कमी होतील. ८ व ९ एप्रिलला कमाल व किमान तापमानात वाढ झाल्याने १००८ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब कायम राहिल. १० व ११ एप्रिलला कोकण पट्टीतील कमाल व किमान तापमानात घसरण होऊन हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील तर उर्वरित राज्यावर १००८ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहतील. राज्याच्या काही भागात ६ व १० एप्रिलला पावसाची शक्यता असून अरबी समुद्र व त्या खालील हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने अवेळी व अवकाळी पावसाची शक्यता कायम राहील. कोकणात ६ एप्रिलला पावसाची शक्यता आहे.
कृषी सल्ला: १. फळबागा दुष्काळात वाचविण्यासाठी बागेवर ८ टक्के केओलीनची फवारणी करावी. खोडाभोवती आच्छादन करावे व ठिबकने पाणी द्यावे. २. जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून बागायत क्षेत्रात मका पेरणी करताना आफ्रिकन टॉल मक्याची पेरणी करावी. ३. जनावरांना दिवसातून ४ ते ५ वेळा पिण्यासाठी पाणी दयावे. ४. शेतीतील कामे सकाळी व सांयकाळी करावीत. ५. उन्हाळी हंगामात जलसंधारणाची कामे करावीत. संदर्भ – ज्येष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
19
0
संबंधित लेख