कृषि वार्ताअॅग्रोवन
एचटीबीटी बियाणांपासून सावधान!
पुणे: तणनाशकाला सहनशील असलेल्या जनुकीय परावर्तित कपाशी बियाण्यांची (एचटीबीटी) बेकायदा विक्री यंदा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही समस्या हाताळण्यासाठी कृषी खात्याने परराज्यांतील पोलिसांचीदेखील मदत घेण्याचे ठरविले आहे. देशात एचटीबीटी बियाणे उत्पादन व विक्रीला मान्यता नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बियाणे विकले जात आहेत. एचटीबीटीच्या काळ्या मार्गाचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि कृषी खात्याचे विशेष पोलिस पथक (एसआयटी)देखील नियुक्त केले गेले आहे. मात्र, काळे धंदे करणाऱ्या टोळ्यांना चाप बसलेला नाही. या बियाण्यांची विक्री यंदाही थांबलेली नाही.
एचटीबीटी बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठी टोळ्यांकडून रेल्वेमार्ग, जलमार्ग आणि महामार्ग अशा तीनही मार्गांचा वापर होतो आहे. महाराष्ट्रात बियाणे उतरविण्यासाठी वर्धा आणि चंद्रपूर अशा दोन जिल्ह्यांना या टोळ्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळे अनधिकृत बियाणे शोधण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देणे, केंद्र शासन व परराज्यातील गृह विभागाची मदत घेणे, असे पर्यायदेखील स्वीकारले जातील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. संदर्भ – अॅग्रोवन, १ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0
संबंधित लेख