AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Apr 19, 06:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
एप्रिल महिन्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता
राज्यात आगामी मान्सून पावसासाठी मान्सून वाऱ्याची दिशा सेट होत असून राज्यावर १००८ हेप्टापास्कल इतका, तर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागरवर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब वाढला आहे. यामुळे मान्सून वारे दक्षिणेकडून नैऋत्येकडून मोठया प्रमाणावर बाष्प वाहून आणण्यास सक्षम झाले आहे. याचा सरळ अर्थ असा की येणारा मान्सून सक्षम राहण्यासाठी राज्यावरील हवेचे दाब अत्यंत अनुकूल बनत आहेत. यामुळे एप्रिल महिन्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता राज्यात निश्चित आहे. कमाल व किमान तापमानात होणारी वाढ हवेचे दाब कमी करते त्यामुळे वारे जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वेगाने वाहतात त्यामुळेच सध्य स्थिती मान्सूनला उत्तम आहे.
कृषी सल्ला: १. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी निचरा प्रणाली २. चोपन जमिनीची सुधारणा करण्यासाठी जिप्समचा वापर ३. जमिन सुधारण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण बांध बंदिस्ती व हिरवळी खतांचा वापर आश्यक ४. मुख्य अन्नद्रव्याबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत ५. भूजल पुर्नभरण पध्दतीचा उपयोग करावा ६. विहीर व कुपनलिका पुर्नभरण महत्वाचे संदर्भ – ज्येष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
59
1