कृषि वार्ताअॅग्रोवन
राज्यातील द्राक्षे पोहचली परदेशात
नाशिक: दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यातील नाशिक, सांगली, सोलापूर, नगर या जिल्ह्यांतून यंदाच्या हंगामात आतापर्यंत ७४८० कंटेनर द्राक्ष सातासमुद्रापार पोचले आहेत. एक लाख ९१० टन द्राक्ष निर्यातीत ८० टक्के वाटा हा नाशिक जिल्ह्याचा राहिला आहे.
राज्यातील नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत सुमारे चार लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा फुललेल्या आहेत. त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यात दोन लाख एकरांवर द्राक्षांची लागवड झालेली आहे. राज्यात गत वर्षाच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढ होऊन ४३ हजार ७१२ एकर क्षेत्राची नोंदणी निर्यातीसाठी झाली होती. यातून आतापर्यंत एक लाख ९१० टन द्राक्ष आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोचली आहेत. संदर्भ – अॅग्रोवन, ३० मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0
संबंधित लेख