हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
राज्यावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होईल. या पुढील काळात तापमान वाढल्यामुळे उष्णता जाणवेल. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. पुर्व किनाऱ्याकडे केवळ १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहिल्यामुळे वाऱ्याची दिशा पूर्वीकडे राहील. मात्र ३१ मार्चला राज्यात कमाल व किमान तापमानात वाढ होऊन तीव्र उन्हाळा जाणवेल. त्यावेळी हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी होतील. १ एप्रिलला हवेचे दाब कमी झाल्याने अवकाळी व अवेळी पावसासाठी वातावरण तयार होईल. २ ते ५ एप्रिल या दरम्यान राज्यावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. वाऱ्याची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे राहील. या संपूर्ण काळात हवामानात अस्थिरता येईल व वादळाद्वारे पाऊस होण्याची शक्यता आहे. ३१ मार्च व १, ४ आणि ५ एप्रिलला मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात पाऊस होईल.
कृषी सल्ला: १. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन धान्य व हळदीची हळकुंडे सुरक्षित स्थळी हलवावी. २. भाजीपाला व पक्व झालेली फळे, फुले यांची काढणी करून माल विक्रीसाठी बाजारात पाठवावा. ३. शेणखत शेतात वाहतूक करून ठेवावी. ४. बांध व बंदिस्तीची कामे पूर्ण करावीत. ५. शेततळयाचे काम पूर्ण करावे. ६. शेतीतील कामे सकाळी लवकर करावी. संदर्भ – ज्येष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
14
0
संबंधित लेख