AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Mar 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
यंदा भात उत्पादकांना उच्चांकी दर
कणकवली - भातशेती तोट्यात जात असल्याने भाताचे उत्पादन घेण्याऐवजी बाजारातून तांदूळ विकत घेणे शेतकऱ्यांनी पसंत केले होते. मात्र यंदा भातासाठी प्रतिक्‍विंटल २२५० रूपये एवढा दर शेतकरी संघाकडून देण्यात आला. या वाढीव दरामुळे शेतकरी सुखावला आहे. हा दर यापुढेही कायम राहिला तसेच शासनाने किमान अडीच हजार रूपये एवढा हमी भाव निश्‍चित केला तर शेतीपासून दुरावलेला शेतकरी पुन्हा भातशेतीकडे वळण्याची शक्‍यता आहे.
लहरी पाऊस, मनुष्यबळाची कमतरता, मजूरी आणि यांत्रिक साधनांचे वाढते दर यामुळे सिंधुदुर्गातील भातशेती तोट्यात होती. पावसाळी हंगामात राबूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेती बंद करून रेशन दुकान तसेच बाजारातून तांदूळ खरेदी करण्याला प्राधान्य दिले होते. मात्र मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांना भात उत्पादनातून चांगला दर मिळू लागला आहे. त्यामुळे भातशेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी बांधवातून व्यक्‍त होत आहे. मागील वर्षी भातखरेदीसाठी १७५० रूपये प्रतिक्‍विंटल आणि शासनाकडून प्रतिक्‍विंटलमागे २०० रूपये बोनस असा १९५० रूपये दर देण्यात आला होता. तर यंदा १७५० रूपये अधिक ५०० रूपये बोनस असा २२५० रूपये प्रतिक्‍विंटल दर निश्‍चित झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याकडील धान्य खरेदी विक्री संघामध्ये देणे पसंत केले. संदर्भ – अॅग्रोवन, २५ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0