कृषि वार्ताअॅग्रोवन
शेतीपिकांना मोजूनच पाणी दिले पाहिजे
पुणे: पाणी ही संपत्ती आहे; पण ती मोजली जात नाही, त्यामुळे दारिद्र्य येत आहे. हे दारिद्र्य दूर करायचे असेल तर पिकांना मोजूनच पाणी दिले पाहिजे यासाठी प्रवाही सिंचन पद्धती बंद केली पाहिजे, असे मत पाणी विषयाचे अभ्यासक डॉ. दि. मा. मोरे यांनी व्यक्त केले.
जागतिक जल दिनानिमित्त भारतीय जलसंस्कृती मंडळ व रेडिओ एफटीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘जलजागर २०१९’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मोरे म्हणाले, ‘‘जल आराखाड्याचा अभ्यास करून पाण्याचा पुनर्वापर किती होऊ शकतो, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सिंचनाचा अभ्यास करताना पीकपद्धती खूप महत्त्वाची आहे. आधुनिक पद्धतीने सिंचन केले तर सिंचन क्षेत्रात वाढ होईल, त्यासाठी परिस्थितीला अनुकूल असलेल्या पीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. संदर्भ – अॅग्रोवन, २५ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0
संबंधित लेख