AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Mar 19, 06:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
अवकाळी पावसाची शक्यता
राज्यावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील्यामुळे किमान व कमाल तापमानात वाढ होईल. ३१ मार्चला कोकण व मध्य भागावर १०१० हेप्टापास्कल तर विदर्भ आणि मराठवाडयावर १०१८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भातील कमाल व किमान तापमानात वाढ होईल. १ एप्रिलला कोकण व घाटमाथ्यावर १०१० तर राज्याच्या मध्य व उत्तरेकडील भागासहित विदर्भावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. कमाल व किमान तापमानात वाढ होईल.
उन्हाची तीव्रता वाढेल. ३ व ४ एप्रिलला पश्चिमेकडून वादळी वारे प्रवेश करतील व राज्याच्या पूर्व व मध्य भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. १. भाजीपाला पिकांवरील किडींचे नियंत्रण २. आंबा पिकांवरील तुडतुडे किडी व भुरी रोगांवर नियंत्रण ३. उन्हाळी हंगामात जनावरांची काळजी योग्य प्रकारे घ्या ४. उन्हाळी भुईमूग पिकाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करा ५. ऊस पिकावरील शेंडा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करा संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
23
0