AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Mar 19, 06:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
आजपासून राज्यात हरभरा खरेदी
किंमत समर्थन योजनेअंतर्गत राज्यामध्ये नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघातर्फे हमीभावाने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. परभणी:नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या केंद्रांवर किंमत समर्थन योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या हंगामातील हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यासाठी सर्वाधिक १२ क्विंटल, तर बीड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी १ क्विंटल ७५ किलो एवढी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार आजपासून हरभरा खरेदी सुरू करावी, असे आदेश सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागांतर्फे देण्यात आले आहेत.
किंमत समर्थन योजनेअंतर्गत राज्यामध्ये नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघातर्फे हमीभावाने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पोर्टलची लिंक मिळत नसल्यामुळे नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अद्याप नोंदणी सुरू न झालेल्या केंद्रांवर हरभरा खरेदी उशिराने सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. संदर्भ – अॅग्रोवन, २५ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
5
0