AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Mar 19, 08:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
शेतकऱ्यांसाठी आता, स्मार्ट प्रकल्प
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना आता माल विकायचे कसे आणि कुठे याबाबत जास्त चिंता करावी लागणार नाही. कारण यासंदर्भात आता, कृषी विभाग पुढाकार घेणार आहे. यासाठी राज्यशासन आता ‘स्मार्ट प्रकल्प’ राबविणार आहे. स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू ‘मार्केटिंग’च असेल, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली. जागतिक बॅंकेच्या मदतीने महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविला जाणार आहे. राज्यातील दहा हजार गावांचा समावेश स्मार्टमध्ये करणार आहे. त्यासाठी २ हजार ११८ कोटी रुपये इतका निधी गुंतविण्यात येणार असून, त्यापैकी १ हजार ४८३ कोटी रुपये जागतिक बँक देणार आहे.
दिवसे म्हणाले की, “विविध पिकांच्या उत्पादनात शेतकऱ्यांनी चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे जादा उत्पादकता उद्दिष्ठ असले तरी ते मुख्य उद्दिष्ट नाही. त्याऐवजी शेतकऱ्यांना मार्केंटिंग क्षेत्रात बळकट करण्याची अतिशय गरज आहे. स्मार्ट प्रकल्पामध्ये पणन आणि कृषी अशा दोन्ही यंत्रणा एकत्रितपणे मार्केटिंगच्या मुद्द्यावर काम करणार आहेत.” संदर्भ – अॅग्रोवन, २२ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0