कृषि वार्ताअॅग्रोवन
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादन
साखरेचे उत्पादन आतापर्यंत झालेल्या १ कोटी ७ लाख टन होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी १४ मार्चपर्यंत राज्यातील १८६ साखर कारखान्यांनी ८४० लाख टन उसाचे गाळप करून ९३.२० लाख टनापर्यंत साखर उत्पादनाची मजल मारली होती. भवानीनगर: आतापर्यंत राज्यात ८९३ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ९९.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ही उच्चांकी कामगिरी राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी साधली आहे. येत्या मार्चअखेर बहुतांश कारखान्यांचा हंगाम संपेल. मात्र, तोपर्यंत साखरेचे उत्पादन आतापर्यंत झालेल्या १ कोटी ७ लाख टन होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी १४ मार्चपर्यंत राज्यातील १८६ साखर कारखान्यांनी ८४० लाख टन उसाचे गाळप करून ९३.२० लाख टनापर्यंत साखर उत्पादनाची मजल मारली होती. या वर्षी हुमणीने छळूनही व पाणीटंचाईने मारूनही उसाच्या उत्पादनाचा विक्रमी आकडा राज्याने गाठला आहे.
राज्यात या हंगामात पुणे व सोलापूर दोन विभाग केल्याने आजअखेर गाळपात कोल्हापूर विभाग ऊसगाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात राज्यात आघाडीवर राहिला. या विभागातील ३८ साखर कारखान्यांनी २०६ लाख टन उसाचे गाळप करून १२.२८ टक्के साखर उताऱ्याने २५.३२ लाख टन साखर उत्पादित केली. त्या खालोखाल सोलापूर विभागातील ४४ साखर कारखान्यांनी १९९ लाख टन उसाचे गाळप करीत दुसरा क्रमांक मिळविला. मात्र, साखरेच्या उत्पादनात पुणे विभागाने २१.६३ लाख टनाचा आकडा गाठून साखरेचे राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन घेतले. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा साखर उतारा फक्त ०.०९ टक्‍क्‍यांनी अधिक असूनही कारखान्यांची वाढलेली दैनंदिन गाळपक्षमता, पाऊस कमी असतानाही उसाच्या पिकावर शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत, यामुळे उत्पादन वाढले. संदर्भ - अॅग्रोवन, २२ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
5
0
संबंधित लेख