हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
कमाल व किमान तापमानात चढउतार शक्य
राज्यावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे सकाळी हवामान थंड तर दुपारी उष्ण राहील. मात्र २४ व २५ मार्चला १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब कमी होईल याचाच अर्थ की कमाल व किमान तापमानात वाढ होईल. उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव होईल. मात्र अदयाप ही वारे इशान्येकडून वाहत असल्याने उन्हाळयाची तीव्रता अदयाप कमीच राहील. २६ ते २८ मार्चला तापमान घटेल आणि हवेचा दाब पुन्हा १०१२ हेप्टापास्कल होतील. २५ मार्चला जळगाव, बुलढाणा व २६ मार्चला विदर्भाचा उत्तरेकडील भागात अल्पशा: पावसाची शक्यता आहे.
कृषी सल्ला: १. राज्यातील काही भागात सकाळी व दुपारची सापेक्ष आर्द्रता अत्यंत कमी झाली असल्याने हवामान अत्यंत कोरडे राहील. त्याचबरोबर योग्य त्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी पिकांना ठिबकने, जनावरे व पक्षांना दिवसातून ४ ते ५ वेळी पाणी पिण्यास द्यावे. २. फळ पिकांवर ८ टक्के केओलीन द्रवाणाची फवारणी करावी. फळबागांमध्ये झाडाच्या बुंध्याशी गवताचे अच्छादन करावे. ३. शेतीतील कामे सकाळी व सायंकाळी करावीत. ४. पिकांना गरजेनुसार पाणी पुरवठा करावा. संदर्भ - जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
12
0
संबंधित लेख