कृषि वार्तालोकमत
कापसाला सहा हजारावर भाव
कापसाचे भाव सहा हजारावर पोहचल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात कापसाची आवक वाढली आहे. आर्वी: मागील तीन ते चार दिवसात कापसाच्या भावात अचानक तेजी आली आहे. यामुळे परिसरातील कापूस विक्री केंद्रांवर कापसाची आवकही वाढली आहे. सध्या सहा हजारांच्यावर कापसाला भाव मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील पंधरवाड्यात कापसाच्या भावात मोठी घसरण सुरू होती. त्यामुळे आर्वीच्या बाजारापेठेत कापसाची आवक मंदावली होती; पण गेल्या चार-पाच दिवसात कापसाच्या भावात तेजी आली. शिवाय दर सहा हजारावर पोहचले. आतापर्यंत आर्वी बाजारात १ लाख ७ हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे.
कापसाच्या भावात अचानक तेजी आल्याने खाजगी कापसाची आवक सध्या जोरात सुरू आहे. यात पहिल्या व चांगल्या प्रतीच्या कापसाला ६ हजार रूपये तर फरतड कापसाला ४,४०० ते ४,५०० रूपये खाजगी बाजारात भाव मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना भाव वाढण्याची प्रतीक्षा होती. या प्रतीक्षेनंतर भावात तेजी आल्याने शेतकºयांनी खासगी बाजारात कापूस विक्रीसाठी आणणे सुरू केले आहे. संदर्भ – लोकमत, २० मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
13
0
संबंधित लेख