कृषि वार्ताअॅग्रोवन
जलसंवर्धन आणि नियोजनासाठी संशोधनात्मक अभ्यास पाहिजे
औरंगाबाद:ज्याप्रमाणे अन्नधान्य टंचाईच्या काळात वैज्ञानिक आणि संशोधनात्मक कार्य झाल्यामुळे अन्नधान्याची मुबलकता निर्माण झाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भूजलाचा, मृदेचा आणि खडकांचा जलसंवर्धन आणि जल नियोजनासाठी संशोधनात्मक अभ्यास झाला पाहिजे. पाणी पुनर्भरणासाठी यावर विविध प्रयोगांचा अवलंब केला पाहिजे. या विषयावर अभ्यास करणाऱ्या संस्था राज्यात वाढविण्याची गरज असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.अशोक तेजनकर यांनी मांडले. जल व भूमि व्यवस्थापन संस्था वाल्मी येथे नुकत्याच आयोजित केलेल्या एक दिवसीय जल जागृती कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
डॉ. तेजनकर म्हणाले, ‘‘पाणी या विषयाकडे विज्ञान म्हणून पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जल नियोजन केल्यास निश्चितच दुष्काळावर मात करता येईल. सगळ्यांना पाणी हा सहज सोपा विषय वाटातो. इतर राज्यात सरासरी पाऊस पडूनही पाणीटंचाई किंवा दुष्काळाचा सामना तेथील जनतेला करावा लागत नाही. परंतु महाराष्ट्रात मात्र ही परिस्थिती वारंवार निर्माण होते. कारण आपण फक्त जमिनीवर पडणाऱ्या व जमिनीवर वाहणाऱ्या पाण्याचे नियोजन करतो. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन भूजलातील पाण्याचे नियोजन करणे आज आवश्यक झाले आहे.’’ संदर्भ – अॅग्रोवन, १९ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0
संबंधित लेख