हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
उन्हाचा पारा वाढेल
राज्यावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. कमाल व किमान तापमानात झालेली वाढ कायम राहील. २४ मार्चला राज्यावरील हवेची दाब कमी होऊन १०१० हेप्टापास्कल इतका कमी होईल. यामुळे किमान व कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ झाल्यामुळे विषवृत्तीय भागावर सुर्याचे किरण प्रखर पडतील. सुर्य उत्तरायणास प्रारंभ होईल. दुपारी उन्हाचा पारा वाढेल. २५ मार्चला उष्ण हवामान राहील व हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका कायम राहील.
कृषी सल्ला: १. आंबा पिकावरील भुरी रोगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक २. उन्हाळी भुईमुग पिकाची काळजी घ्यावी. ३. भाजीपाला पिकांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी. ४. जनावरांना चारा पुरवठा करण्यासाठी आफ्रिकन टाॅल मक्याची पेरणी करावी. ५. पिकांना पाणी पुरवठा ठिबक सिंचन पध्दतीने करावा. ६. जनावरे, शेळया, मेंढया, म्हशी, गाई व कुक्कुटपालनास दिवसातून ४ वेळा पाणी पुरवठा करावा. संदर्भ- जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ.रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0
संबंधित लेख