कृषि वार्तालोकमत
विदर्भात तीन ठिकाणी साकारणार ‘सिट्रस इस्टेट’
अमरावती: संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताकरिता विदर्भातील तीन ठिकाणी ‘सिट्रस इस्टेट’ साकारले जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. मोर्शी तालुक्यातील उमरखेड, काटोल तालुक्यातील धिवरवाडी व वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तळेगाव येथे या सिट्रस इस्टेटची उभारणी केली जाणार आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी ३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
संत्रा, मोसंबीचे उत्पादन वाढविण्यापासून ते विक्रीपर्यंतची व्यवस्था विकसित करण्यासाठी पंजाबच्या धर्तीवर विदर्भातील नागपूर, अमरावती व अकोला हा परिसर ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून विकसित केला जाईल. पंजाबमध्ये ६० हजार हेक्टरवर संत्र्याच्या किन्नो जातीची लागवड आहे. तेथे हेक्टरी २२ ते २५ टन उत्पादन होते. विदर्भात मात्र ही उत्पादकता सात ते आठ टन आहे. पंजाबमध्ये ‘सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून संत्रा उत्पादकांना संत्रा कलम तयार करण्यापासून ते विक्री व्यवस्थापनापर्यंत मार्गदर्शन केले जाते. त्याच धर्तीवर विदर्भातही मदत व्हावी म्हणून सात-आठ वर्षांपासून महाऑरेंज प्रयत्न करीत आहे. आता त्याला आकार आला आहे. संदर्भ – लोकमत, ८ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0
संबंधित लेख