AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Mar 19, 07:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
तुरीचा सेंद्रिय ब्रॅंड विकसित करावा- डॉ.उस्मान
परभणी:जमीन आणि मानवाचे आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा स्वीकार करावा. त्यासाठी आवश्यक पशुधनाची संख्या वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. सेंद्रिय उत्पादनांना चांगला बाजारभाव मिळण्यासाठी शेतमालाचे प्रमाणिकरण करणे महत्त्वाचे आहे. मराठवाड्यातील तूर पिकाचा सेंद्रिय ब्रॅंड विकसित केल्यास शेतकरी देशात ओळख निर्माण करू शकतील, असे प्रतिपादन हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (क्रीडा) येथील विभाग प्रमुख डॉ. एम. उस्मान यांनी केले.
डॉ. उस्मान म्हणाले, ‘‘सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये आंतरपीक पद्धती, पिकांचा फेरपालट आवश्यक आहे. सीताफळ, करंज, कण्हेर या सारख्या वनस्पतींपासून तयार करण्यात आलेली कीडनाशकांचा वापर करून कीड व रोग व्यवस्थापन करता येईल. बायोगॅस स्लरी, गांडूळखत, निंबोळी अर्क आदी जैविक निविष्ठांच्या वापरामुळे उत्पादकता वाढीस मदत होईल. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी कडवंची (जि. जालना) या गावाप्रमाणे पाणलोट विकास कार्यक्रमातून जलसंधारणाचे मॅाडेल गावोगावी तयार करणे आवश्यक आहे. संदर्भ – अॅग्रोवन, १३ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0