हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
हवामान ढगाळ व कोरडे राहील
१६ व १७ मार्चला राज्यावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहिल्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येईल. त्याचबरोबर दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत मोठी घट होऊन हवामान कोरडे राहील. १८ मार्चलादेखील अशीच हवामान स्थिती कायम राहील. मात्र १९ मार्चला किमान व कमाल तापमानात मोठी वाढ होऊन उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरूवात होईल. २० मार्चला कमाल व किमान तापमान कायम राहील. मात्र दुपारच्या आर्द्रतेत मोठी घट होऊन हवामान कोरडे राहील. २१ मार्चला हवामान स्थितीत बदल होईल. राज्यावरील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कलपर्यंत वाढल्यामुळे कमाल व किमान तापमानात थोडी घसरण होईल, हीच स्थिती २२ व २३ मार्चला राहील.
कृषी सल्ला: १. उष्ण हवामानात वाढ होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करून पिकांना ठिबकने पाणी पुरवठा करण्यावार भर दयावा. २. नारळास चारी बाजूस लाकडी खुंट उभे करून त्यावर किलतान अडकवून सावली करावी. ३. फळबागावर ८ टक्के केओलीन द्रावणाची फवारणी करावी. ४. जनावरे शक्यतो सावलीत बांधावीत. ५. शेतातील कामे सकाळी व दुपारी करावीत. ६. पाटाने पाणी दिल्यास भुईमूग, बाजरी, मूग, सुर्यफूल व भाजीपाला पिकांना ८ दिवसांच्या अंतराने पाणी दयावे. ७. जनावरांना व पक्षांना दिवसातून ४ वेळा पाणी दयावे. संदर्भ- जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ.रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
14
0
संबंधित लेख