कृषि वार्ताअॅग्रोवन
मुंबईत १० एप्रिलपासून आंबा महोत्सव
कोकणातील आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी मुंबईमध्ये १० एप्रिल ते २८ मे दरम्यान आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई: कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने कोकणातील आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी मुंबईमध्ये १० एप्रिल ते २८ मे दरम्यान आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे आयोजन दादर, विलेपार्ले, ठाणे, बोरीवली व मुलुंड या पाच ठिकाणी केले जाणार आहे. आंबा महोत्सव हे नव्या विक्री व्यवस्थेतील पहिले पाऊल आहे. यापुढे अशा आधुनिक विपणन व्यवस्था कोकण विकास प्रतिष्ठान, आंबा उत्पादकांप्रमाणेच दर्जेदार कोकणी पदार्थ उत्पादक व महिला बचत गटांसाठीही राबवणार आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षी आंबा महोत्सव सभा, रत्नागिरी, देवगड व मुंबई येथे ठेवण्यात आलेल्या आहेत. संदर्भ – अॅग्रोवन, १३ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0
संबंधित लेख