कृषि वार्ताअॅग्रोवन
गोशाळांना मिळणार २५ लाख रू.
एका गोशाळेला एक कोटी रुपये निधी देण्याऐवजी २५ लाख रू. निधी दिले जाणार आहे.
मुंबई:एका गोशाळेला एक कोटी रुपये निधी देण्याऐवजी २५ लाख रुपये दिले जाणार आहे. पहिल्या दोन वर्षांत १३९ गोशाळांना हा निधी देण्यात येईल. या सुधारित योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य शासनाकडून २०१९-२०२० या आर्थिक वर्षात नवीन सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना राबविण्यात येणार आहे. मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून राज्यातील उर्वरित ३४ जिल्ह्यांतील १७९ उपविभागांपैकी, ज्या महसुली उपविभागांमध्ये यापूर्वीच्या योजनेत गोशाळांसाठी अनुदान देण्यात आले आहे, असे ४० उपविभाग वगळता इतर १३९ उपविभाग या नवीन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक उपविभागामधून एक याप्रमाणे गोशाळांची निवड करून त्यांना अनुदान देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात १५ लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यात १० लाख रुपये असे एकूण २५ लाख रुपयांचे अनुदान एकवेळचे अर्थसाह्य म्हणून प्रत्येक गोशाळेस दिले जाणार आहे. संदर्भ – अॅग्रोवन, १० मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
14
0
संबंधित लेख