हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात उन्हाचा चटका जाणवेल
राज्यावर १६ व १७ मार्चला हवेचे दाब १०१२ व १०१० हेप्टापास्कल राहिल. किमान व कमाल तापमानात कमी-जास्त वाढ झाल्यामुळे उन्हाळी हंगामा सुरू झाल्याचे जाणवेल. दुपारी उष्म वातावरण जाणवेल. १८ मार्चला हवेच्या दाबात १०१२ हेप्टापास्कलपर्यंत वाढ होऊन सौम्य उन्हाळा जाणवेल. त्याचबरोबर किमान व कमाल तापमान घसरेल व सकाळी थंड हवामान जाणवेल. १७ मार्चला उत्तर महाराष्ट्र व विदर्भात हवामान ढगाळ राहील.
कृषी सल्ला: १. या पुढील काळात तापमान वेगाने वाढेल – जनावरांची, पिकांची, फळबागांची काळजी घ्या. २. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचे – वनस्पतींना १६ अन्नद्रव्यांची गरज असते. ही अन्नद्रव्ये प्रमाणात दिल्यास एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते. ३. उन्हाळी हंगामात फळभाज्या,पालेभाज्या,मूग, बाजरी ही पिके घ्या. ४. नालाबंदिस्ती करून पाणी अडविणे व जिरवणे गरजेचे ५. डोगर उतारावरील टेरॅसिंग फायदयाचे ६. जल व मृद संधारणाची गरज संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
30
0
संबंधित लेख