AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Mar 19, 07:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
दूध भुकटी प्रकल्पांच्या अनुदान योजनेस मुदतवाढ
पुढील 3 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ३० एप्रिल २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. मुंबई: राज्यातील दूध भुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खाजगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुदान देण्याची योजना पूर्वलक्षी प्रभावाने पुढील 3 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ३० एप्रिल २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. त्याचबरोबर या कालावधीसाठी प्रति लिटर 3 रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णयास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर दूध भुकटीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दूध भुकटी उत्पादनात वाढ होऊन काही अंशी दुधाचा वापर दूध भुकटी रुपांतरणासाठी होणार आहे. तरीही उर्वरित अतिरिक्त दुधाचा वापर होण्याची आवश्यकता लक्षात घेऊन दूध अनुदान दरात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार दुधाला प्रति लिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. संदर्भ – कृषी जागरण, ९ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0