AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Mar 19, 07:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
साखर उद्योगात घडला इतिहास
देशातील ५१५ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्यापैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे. साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा प्रथमच देशातील साखर कारखान्यांनी ऑईल कंपन्यांना ५१ कोटी लिटर इथेनॉलच्या पुरवठ्याची हमी दिली आहे. त्यापैकी १२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा फेब्रुवारी महिना अखेरीस केला असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली.
देशातील ५१५ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्यापैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे. देशात यंदा ३०७ लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. फेब्रुवारी अखेरीस देशातील ४६६ कारखाने सुरु होते. तर, २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात १ मार्च अखेरीस ८३७.७२ लाख टन ऊस गाळपातून ९२.५० लाख टन साखर उत्पादित झाली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ७ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0