AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Mar 19, 08:00 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
तापमानात चढ-उतार
महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील्यामुळे सकाळी थंड व दुपारी उष्ण हवामान राहील. १० व ११ मार्चलादेखील हवेचा तितकाच दाब राहील. हा हवेचा दाब राज्यातील मध्य भागावर म्हणजेच पुणे, सातारा, अहमदनगर जिल्हयात हवामान अंशत ढगाळ राहील. मात्र ११ मार्चला याच भागात हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल.
कृषी सल्ला: १. मातीच्या आरोग्याला प्राधान्य दयावे – माती ही चांगल्या उत्पादनाचा पाया आहे. माती झाडाला पाणी व पोषक अन्नद्रव्ये पुरवते. मातीची पाणी साठवण क्षमता व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अत्यंत महत्वाची आहे. २. मातीतील अन्नद्रव्ये व त्याविषयी उपचार करणे आवश्यक ३. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचे आहे – जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म टिकविण्यास सेंद्रिय खतांचा व हिरवळी खतांचा पुरवठा करावा. ४. उन्हाळी बागायती कपाशीची लागवड करा – कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ, कोरडे व उबदार हवामान अनुकूल असते. ५. उन्हाळी हंगामात हिरवा चारा उत्पादन करा ६. दुभत्या जनावरांची उन्हाळी हंगामात योग्य प्रकारे काळजी घ्या संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ.रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
17
0