AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Mar 19, 07:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
पाहा, महाराष्ट्रातील नारी शक्ती
महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील नारी शक्तीने दिल्ली गाजवली नवी दिल्ली: केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माहिलांना ‘नारी शक्ती’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा हा पुरस्कार देशभरातील एकूण ४४ महिलांना प्रदान करण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा
महिलांचा समावेश आहे. या महिलांमध्ये मुंबईतील सीमा राव, स्मृती मोरारका, कल्पना सरोज, सीमा मेहता, अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे, सातारा जिल्ह्याच्या चेतना गाला सिन्हा यांचा सन्मान होणार आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवन येथे होणार आहे. संदर्भ – कृषी जागरण, ८ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
0
0