कृषि वार्तालोकमत
राज्यात ५० लाखाहून अधिक डिजिटल सातबारा उतारे पूर्ण
राज्य शासनाने हाती घेतला असून आत्तापर्यंत ५० लाख ८५ हजार २९७ डिजीटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
पुणे: महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत नागरिकांना डिजीटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला असून आत्तापर्यंत ५० लाख ८५ हजार २९७ डिजीटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही १ कोटी ५७ लाख ३ हजार २३३ उतारे डिजिटल स्वरुपात तयार करण्याचे काम शिल्लक आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाची यंत्रणा पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या कामात व्यस्त असल्याने डिजिटल सातबारा उता-याच्या कामावर परिणाम झाला आहे. सातबारा उतारे मिळण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना होणारा तलाठी कार्यालयाकडून त्रास कमी करण्यासाठी ई -फेरफार प्रक्रियेंतर्गत डिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी तलाठी कार्यालयात सातबारा उता-यामधील दुरूस्तीसाठी गाव पातळीवर उता-यांचे चावडी वाचन केले गेले. तसेच सक्षम अधिका-याकडे अर्ज करून उता-यातील दुरूस्तीसाठी वेळ देण्यात आला होता. मात्र, तरीही अनेक शेतक-यांच्या सातबारा उता-यात काही तृटी दिसून येत होत्या. त्यामुळे महसूल विभागातर्फे दुरूस्तीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. संदर्भ – लोकमत, २ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0
संबंधित लेख