AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Mar 19, 02:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
‘या’ शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये खासगी बाजार व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. मुंबई: राज्यात खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीमध्ये खासगी बाजार व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये आणि जास्तीत जास्त २५ क्विंटल प्रती शेतकरी अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ १६ थेट पणन परवानाधारक आणि ११ खासगी बाजार परवाना धारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. मंत्रालयात सोयाबीन अनुदान योजनेमध्ये खासगी बाजार समित्यांचा समावेश करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशमुख म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर शासनमान्य खासगी बाजार व थेट पणन परवानाधारक व्यक्ती/संस्था यांचे कामकाज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाप्रमाणेच सुरु असल्याने त्यांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार खासगी बाजार व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संदर्भ – कृषी जागरण, ६ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
8
0