हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
पाहा, हवामानानुसार कृषी सल्ला
राज्यावर ९ ते ११ मार्चला १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे सकाळी थंड तर दुपारी उष्ण हवामान राहील. हा हवेचा दाब सर्वसाधारणपणे राज्यावरील मध्य भागावर म्हणजेच पुणे, सातारा, अहमदनगर जिल्हयात हवामान अंशत: ढगाळ राहील. मात्र ११ मार्चला याच भागात हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे राज्यात हवामान दुपारी उष्ण, सकाळी थंड व अत्यंत कोरडे राहील. हवामान बदल जाणविणार नाही.
कृषी सल्ला: १. मातीच्या आरोग्याला प्राधान्य दयावे. २. मातीतील अन्नद्रव्य व त्याविषयी उपचार घ्यावे. ३. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचे आहे. ४. उन्हाळी बागायती कपाशीची लागवड करा. ५. उन्हाळी हंगामात हिरवा चारा उत्पादन करा. ६. दुभत्या जनावारांची उन्हाळी हंगामात योग्य प्रकारे काळजी घ्या. संदर्भ – ज्येष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
19
0
संबंधित लेख