AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Mar 19, 08:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
पाहा,‘सन्मान’मध्ये शेतकऱ्यांच्या नोंदणीचा आकडा
पुणे : ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने’ अंतर्गत राज्यातील ४२ हजार ३०७ गावांतील पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत. बुधवारपर्यत ५७ लाख ४८ हजार ६०० पात्र शेतकरी कुटुंबांची नावे पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत. तर पुणे विभागातील ८ लाख २९ हजार ९१७ पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे. पुणे विभागातील एकूण ८ लाख २९ हजार ९१७ पात्र शेतकरी कुटुंबांपैकी सातारा जिल्ह्यातील १७०४ गावांतील ३ लाख २७ हजार २८४ पात्र शेतकरी कुटुंबे, पुणे जिल्ह्यातील १८११ गावांतील दोन लाख ५७ हजार ८३१ पात्र शेतकरी कुटुंबे, तर सोलापूर जिल्ह्यातील ११०५ गावांतील दोन लाख ४४ हजार ८०२ पात्र शेतकरी कुटुंबांची नावे राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत, अशी माहिती एनआयसीच्या सूत्रांनी दिली. या शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर योजनेचा पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, राज्यातील अन्य पात्र शेतकऱ्यांची नोंद करण्याचे काम वेगाने सुरू आहे. संदर्भ- अॅग्रोवन, ३ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
देशपातळीवरील पहिल्या राष्ट्रीय जल पुरस्कारासह राज्याला विविध श्रेणींमध्ये १० पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये अहमदनगर, लातूर, बीड, वर्धा या जिल्ह्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. संदर्भ – कृषी जागरण, २६ फेब्रुवारी २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
7
0