कृषि वार्ताकृषी जागरण
महाराष्ट्राला राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली: संपूर्ण राज्यात १७० पुलवजा बंधारे बांधण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून या कामांमुळे राज्याचे दुष्काळी चित्र पालटणार आहे, असा विश्वास केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात व्यक्त केला. याप्रसंगी जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याला पहिला राष्ट्रीय जल पुरस्कार गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गडकरी म्हणाले, पाण्याचा अचूक वापर व योग्य नियोजन महत्त्वाचे बनले असून पाण्याच्या नियोजनवरच देशाचा विकास अवलंबून आहे. जलसंधारण क्षेत्रात जनजागृती करण्याच्या उद्देशाने जल पुरस्काराची सुरवात करण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे या भागात पाण्याचे साठे निर्माण झाले आहेत.
देशपातळीवरील पहिल्या राष्ट्रीय जल पुरस्कारासह राज्याला विविध श्रेणींमध्ये १० पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये अहमदनगर, लातूर, बीड, वर्धा या जिल्ह्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. _x005F_x000D_ _x005F_x000D_ संदर्भ – कृषी जागरण, २६ फेब्रुवारी २०१९_x005F_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1
0
संबंधित लेख