कृषि वार्ताकृषी जागरण
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर
पाहूया, शेतकऱ्यांसाठी काय आहे अर्थसंकल्पमध्ये मुंबई: महाराष्ट्र राज्याचा सन २०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत नुकताच सादर केला. अर्थसंकल्पाची शेतीशी निगडीत ठळक वैशिष्ट्ये: • ‘जलयुक्त शिवार योजने’तून मे २०१९ अखेर २२ हजार गावे टंचाईमुक्त करणार. या योजनेसाठी १ हजार ५०० कोटी रुपये. • सूक्ष्म सिंचन, विहिरी, शेततळे, यासह रोजगार हमी योजनेसाठी ५ हजार १८७ कोटी रुपये. • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान यासारख्या विविध योजनासह एकूण कृषीसाठी ३ हजार ४९८ कोटी रुपयांचा निधी. • ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’तून ५१ लाख शेतकऱ्यांना २४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम प्राधिकृत. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांला कर्जमाफीचा लाभ देणार, निधी कमी पडू दिला जाणार नाही. • चार वर्षात ४ लाख ४० हजार कृषी पंपांना वीज जोडण्यासाठी ५ हजार ११० कोटी रुपयांचा खर्च २०१९-२० मध्ये ९०० कोटी रुपयांची तरतूद. • पुढील ३ वर्षात १ लाख सौरपंप बसवण्याचे शासनाचे उद्दिष्ट.
• दुध-कांदा, तूर, हरभरा, धान उत्पादकांना विविध योजनांद्वारे अनुदान. ५०० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप. ४०० कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्याची कार्यवाही सुरु. • धान उत्पादकांना द्यावयाच्या बोनस रकमेत प्रतिक्विंटल २०० वरुन ५०० एवढी वाढ केली. • ग्रामीण विकासाचा मूलाधार असलेल्या सहकारी संस्थांना कृषी व प्रक्रिया उद्योगात प्रोत्साहन देण्यासाठी ‘अटल अर्थसहाय्य योजना’ यासाठी ५०० कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले. संदर्भ – कृषी जागरण, २८ फेब्रुवारी २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
10
0
संबंधित लेख