हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
उन्हाळयाची चाहूल लागेल
राज्याच्या उत्तर भागावर १०१० हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे दक्षिण राज्यात कमाल व किमान तापमान वेगाने वाढेल. उत्तर राज्यात तुलनेने संथ गतीने वाढेल अशी स्थिती आहे. ३ मार्चलादेखील राज्यावर १०१० हेप्टापास्कल इतका समान हवेचा दाब राहील्यामुळे किमान व कमाल तापमानातील वाढ हळुवारपणे वाढत जाईल. ४ व ५ मार्चला राज्यावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील म्हणजेच किमान व कमाल तापमान वाढण्यास प्रारंभ होऊन उन्हाळयाची चाहूल सुरू होईल. ६ मार्चलादेखील तापमान वाढीचा कल कायम राहील.
कृषी सल्ला: १. उन्हाळयामध्ये पिकांसाठी पाण्याची गरज लक्षात घेऊन उन्हाळी भुईमुग, सुर्यफूल, फळभाज्या या पिकांना ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्याचबरोबर ठिबकद्वारे पाणी देत असल्यास त्याचा कालावधी वाढवावा. २. जमिनीचे सपाटीकरण व बांध बंदिस्तीची कामे करावीत. ३. शेत तळ तयार करावयाची असल्यास ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा फायदा घ्यावा. ४. जनावरांना सावलीत बांधावे व स्वच्छ पाणी पिण्यास दयावे. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या
18
0
संबंधित लेख