AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Feb 19, 06:30 PM
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
पाहा, कधी पडणार पाऊस
राज्यावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होईल असे स्पष्ट होते. ३ मार्चला अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे उत्तर व मध्य राज्यात हवामान ढगाळ होऊन हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यामुळे मोठया प्रमाणात बाष्प निर्मिती होईल व हवामान ढगाळ राहील. ४ मार्चला मध्य व पूर्व विदर्भावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. येथील कमाल व किमान तापमान वाढेल. उर्वरित राज्यावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील्यामुळे वाढलेले तापमान कायम राहील.
कृषी सल्ला: १. पाण्याचा वापर जपून करावा – उन्हाळी हंगामा सुरू झाल्यामुळे तापमान वाढत आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे. यंदा कमाल तापमान अनेक ठिकाणी विक्रमी ठरू शकेल. किमान तापमान ही वेगाने वाढेल. बाष्पीभवनाचा वेग वाढत एप्रिल महिन्यात प्रतिदिनी १४ ते १६ मिलीमीटर बाष्पीभवनाचा वेग वाढेल. त्यामुळे प्राणी,पक्षी,मानव,जनावरे यांचे शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी पाण्याची गरज वाढत जाईल. २. फळबागांची काळजी घ्यावी – लहान असलेल्या व नवीन लागवड केलेल्या फळझाडांना लहान मंडप करून सावली करणे व बाष्पीभवन विरोधक आच्छादनांचा वापर करण्यावर भर दयावा. ३. ऊस पिकाचा खोडवा ठेवताना पाचट एका सरीत, तर दुसरी सरी मोकळी ठेवून सरी आड सरी द्या. ४. दुभत्या जनावारांना पोटभर पाणी व हिरवा चारा द्या – दुभत्या जनावरांना पाण्याची गरज अधिक असते. त्यांना पाण्याबरोबरच पोटभर हिरवा चारा दिल्यास दुग्धोत्पादन चांगले मिळते. त्यासाठी दुभत्या जनावरांना सकाळ, दुपार व सायंकाळ पोटभर पाणी पाजावे. ५. हिवाळी नांगरट महत्वाची जमिनीची बांध बंदिस्ती व सपाटीकरणाची कामे करावीत. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ.रामचंद्र साबळे
111
24